नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ ‘सेंट्रल ट्रेड युनियन्स’च्या संयुक्त मंचाने 28 ते 29 मार्च 2022 या दोन दिवसांसाठी देशव्यापी बंद (Bharat Bandh) ची हाक दिली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (All India Bank Employees Association) संपाला पाठिंबा जाहीर केल्याने या बंदमुळे बँकेच्या कामकाजावरही परिणाम होऊ शकतो.
मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात भारत बंद पुकारण्यात येत असून त्याचा फटका कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने फेसबुकवर लिहिले की, बँकिंग क्षेत्रही या संपात सहभागी होणार आहे.
No comments:
Post a Comment