मुंबईकरांना घरा शेजारी मिळणार मोफत आरोग्य सेवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 February 2022

मुंबईकरांना घरा शेजारी मिळणार मोफत आरोग्य सेवा



मुंबई - कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी मुंबई महापालिकेने आरोग्यावर भर दिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ६९३३.७५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. यात विविध सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत. मुंबईकरांना मोफत आणि माफक दरात तात्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी प्रत्येक विभागात घराशेजारी हिंदू ह्दय बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे उपलब्ध केली जाणार आहेत. यात रक्त, लघवी अशा विविध तपासण्या मोफत केल्या जाणार असून रेडिओलॉजीकल चाचण्या मात्र पालिकेच्या दरात करण्यात आल्या आहेत. या सेवा घरा शेजारी असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. (free medical services to Mumbaikar)

मुंबई महापालिकेची केईएम, नायर, सायन ही प्रमुख रुग्णालये आहेत. मात्र मुंबईसह राज्याच्या कानाकोप-यातून रुग्ण येत असल्याने याचा ताण प्रमुख रुग्णालयांवर येतो. त्यामुळे विभागवार घराशेजारी बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र उपलब्ध केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये प्रतीक्षालय, डॉक्टर्स, औषधालय परिचारिका कक्ष व रुग्ण तपासणी कक्ष यांचा समावेश असेल. या केंद्रात रक्त व लघवी या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. शिवाय विविध प्रकारच्या १३९ चाचण्या तसेच क्ष- किरण चाचणी, सीटीस्कॅन, मॅमोग्राफी आदी चिकित्सा माफक दरात केल्या जाणार आहेत. या केंद्रावर टेलिमे़डिसिन मार्फत केईएम, सायन, नायर व कूपर रुग्णालय येथील विशेष डॉक्टरांचे सल्ले उपलब्ध करण्यात येईल. तसेच मधुमेह, कर्करोग, उच्चरक्तदाब, ह्दय रोग, आदी आजारांचे तपासणी कार्यक्रम राबवण्यात येतील.

तर दुस-या टप्प्यांतर्गत अतिरिक्त १०० आरोग्य केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. या उपक्रमासाठी या आर्थिक वर्षात भांडवली खर्चासाठी २५० कोटी व महसूल खर्चासाठी १५० कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

शिवयोग केंद्र सुरु करणार -
आजार झाल्यानंतर उपचारात्मक उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे आवश्यक असल्याने शिवयोग केंद्र सुरु केले जाणार आहे. ही योग केंद्रे सार्वजनिक सभागृहे, महापालिका, किंवा खासगी शाळा, सभागृहे, मंगल कार्यालये आदी ठिकाणी चालवली जाणार आहेत. सर्व केंद्रासाठी सूचना व लक्ष देण्यासाठी प्रशिक्षकांचे पॅनल तयार करण्यात येईल व त्यापैकी योग प्रशिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. एकूण २०० शिव योग केंद्रे स्थापन करण्यात येणार असून या आर्थिक वर्षासाठी २५ कोटी भांडवली व ५ कोटी महसूली तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad