चैत्यभूमीवर व्ह्युविंग गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2022

चैत्यभूमीवर व्ह्युविंग गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव

 

मुंबई - चैत्यभूमीवर मुंबई महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या व्हयूविंग गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव देण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्यानंतर याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामकरणाची मागणी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे जी-उत्तर विभाग कार्यालयाकडे केली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव दिले जाणार आहे.

दादर चैत्यभूमी येथील व्ह्युविंग गॅलरीचे लोकार्पण पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माता रमाबाई व्ह्यूविंग गॅलरी असा उल्लेख केला. नामकरणाबाबत तसे निर्देशही दिले. मात्र नामकरणाच्या प्रस्तावाला जी-उत्तर प्रभाग समिती स्थापत्य समिती, आणि सभागृहाची मान्यता न मिळाल्याने गॅलरीच्या नावाची पाटी अद्याप तयार करण्यात आलेली नाही. मात्र नामकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा नामफलक लावला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दादर चौपाटी येथे गेल्या ९ फेब्रुवारी रोजी ‘व्ह्यूविंग गॅलरीचे लोकार्पण करण्यात आले. ‘व्ह्यूविंग डेक’चे नामकरण ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्यूविंग डेक’ असे करण्याचे निर्देश मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका प्रशासनाला लोकार्पण करतेवेळी दिले आहेत. त्यानुसार नामकरण करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सभागृह नेत्या व स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘जी-उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना नामकरण बाबत ठरावाची सूचना देणारे पत्र दिले आहे.

प्रभाग समितीच्या मान्यतेनंतर लवकरच जाहीर कार्यक्रमादरम्यान अधिकृतपणे नामकरण केले जाईल, असे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad