समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2022

समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल



नवी मुंबई - अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Shahrukh Khans son Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे  (Sameer Wankhede) आणि एनसीबी (Ncb) चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर नवाब मलिकांनी सनसनाटी आरोप करत हा मुद्दा आणखीनच तापला होता. अशातच आता समीर वानखेडे यांच्याविरोधात नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरी पोलिस ठाण्यात समीर वानखेडेंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. कमी वयात बारचा परवाना घेतल्याचा ठपका समीर वानखेडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच कार्डेलिया क्रूझ ड्रग आणि आर्यन खान प्रकरण एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर असलेल्या समीर वानखेडे यांना चांगलंच भोवलं असल्याची चर्चा रंगली आहे.

समीर वानखेडे यांच्यावर फक्त कमी वयात बारचा परवाना घेण्याबाबत आरोप करण्यात आला आहे, अशातला भाग नाही. तर त्यांच्यावर खोटारडेपणा करणे, तत्थ्यासोबत छेडछाड करणे तसंच चुकीचा माहिती देणे, असेही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोपरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा नवी मुंबईत बार आहे. या बारचं नाव सद्गुरु हॉटेल एन्ड बार असं आहे. या सद्गुरु हॉटेल आणि बारचा परवाना काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आला होता. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा परवाना रद्द करण्याची कारवाई केली होती. परवाना काढण्यासाठी समीर वानखेडे यांनी दाखवलेली कागदपत्र बनावट असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या बारविरोधात कारवाई करत बारचं लायसन्स रद्द केलं होतं. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आधीच समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad