अकोला : महिलेला अश्लील व्हिडीओ आणि फोटो (Obscene Video) पाठवणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडल्याचं उघडकीस (Akola Crime) आलं आहे.
अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवून युवक महिलेला मानसिक त्रास देत होता. त्यामुळे तिने या युवकाच्या विरोधात पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या. अभिषेक गिरी असं अटक झालेल्या आरोपीचं नाव आहे.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महिलेला एक युवक अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवून मानसिक त्रास देत होता. या महिलेने आरोपी युवकाच्या विरोधात खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. व्हिडीओचा आधार घेत पोलिसांनी त्या युवकाचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या विरुद्ध 292 आयपीसी कलम 66 (अ) आयटी एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर परिसरात राहणारा अभिषेक गिरी हा गेल्या काही दिवसांपासून पीडित महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवत असे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने या युवकाची माहिती खदान पोलिसांनी दिली आणि पोलिसांनी सापळा रचून आरोपी अभिषेक गिरी याला अटक केली.
आरोपीकडे असलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्यामध्ये अश्लील व्हिडीओ आढळून आले आहेत. यापूर्वी सुद्धा या आरोपी विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यावेळी समज देऊन या युवकाला सोडून देण्यात आले होते. पण त्याने पुन्हा तीच चूक केली असून त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment