मुंबई - उंदीर मारण्याच्या कामात माेठा भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आराेप करणार्या भाजपाला आज महापाैरांनी सडेताेड उत्तर दिले. विधानपरिषदेचे विराेधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना सचिवालयातील उंदीर मागण्याचे कंत्राट दिले हाेते, त्यांनी किती उंदीर मारले याचा आधी तपशील द्या, आम्ही तर मारलेले सगळे उंदीर तुमच्या घरी पाठवू, बसा माेजत, असा निशाणा महापाैरांनी भाजपावर साधला आहे. गाेव्यात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्या प्रसार माध्यमांशी बाेलत हाेत्या.
मुंबई पालिकेच्या कीटकनाशक विभागाकाडून त्रासदायक ठरणाऱ्या मूषक संहाराचे काम केले जाते. पालिकेने पाच प्रभागात मूषक संहारासाठी १ कोटी रुपये इतकी रक्कम खर्च केली आहे. मात्र या कंत्राटावरून भाजपने प्रशासनाला धारेवर धरले. पालिकेच्या प्रस्तावात नेमके किती उंदीर, कोणत्या ठिकाणी मारण्यात आले, त्यांची उत्पत्ती तसेच उपाययोजना आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले. यात घोटाळा झाला असून वेळ आल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. मुंबईत पालिकेचे २४ विभाग असून त्यातील १२ विभागात उंदीर मारण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यापूर्वी, २०२० मध्ये पालिकेने एका वर्षासाठी निविदा काढल्या होत्या. याला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावावरून भाजपाने शिवसेनेवर जाेरदार टीका केली. उंदरांवरून आता राजकीय वाद रंगला आहे.
दरेकर यांनी सचिवालयातील उंदीर मारण्याचे कंत्राट घेतले हाेते. सचिवालयात त्यांनी किती उंदीर मारले याचा तपशील द्या, उरलेला तपशील आम्ही देऊ. आमच्याकडे जालिम गाेळ्या आहेत. त्याही देताे. मारलेले उंदीरही तुमच्या घरी पाठवू. माेजत बसा, उंदरांवरून राजकारण करू नका, असा सबूरीचा सल्लाही त्यांनी दिला.
No comments:
Post a Comment