मुंबई - मुंबई महानगरपालिकेत अनेक कामे केली जातात. पालिकेच्या अनेक कामात व्हेरिएशन होते. एकाच कामासाठी अनेक सल्लागार नियुक्त केले जातात. पालिकेत कंत्राटदारांच्या तुलनेत तिप्पट सल्लागार आहेत. व्हेरिएशन आणि सल्लागार यावर होणारी उधळपट्टी थांबवण्याची गरज असल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेचा सन २०२२ -२३ चा ४५ हजार कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केला आहे. हा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये मंजूर करताना आपल्या भाषणादरम्यान रवी राजा बोलत होते. यावेळी बोलताना मुंबई महानगरपालिकेत जितके कंत्राटदार आहेत त्यापेक्षा तिप्पट सल्लागार आहेत. या सल्लागारांवर ७०० ते ८०० कोटींची उधळपट्टी केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेत चांगले अधिकारी अभियंते आहेत त्यांना काम द्या असे रवी राजा म्हणाले. पार्किंगच्या माध्यमातून मिळणारा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाल्यास पालिकेचे उत्पन्न वाढेल मात्र हा पैसा कंत्राटदारांच्या खिशात जात असल्याने पालिकेचे नुकसान होत असल्याचे रवी राजा म्हणाले.
मुंबईमध्ये गेल्या ४ वर्षात १८ पुलांची कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी पालिका २०१८ कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या चार वर्षात १८ पुलांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असली तरी त्यामधील एकही पूल बांधून तयार झालेला नाही. मुंबईमधील रस्ते काँक्रीटचे केले जात आहेत. हे चांगले काम असलेलं तरी एक रस्ता काँक्रीटचा होण्यासाठी काही वर्षे लागतात. हे रस्ते तयार झाल्यावर त्याचा हमी कालावधी किती वर्षे आहे, नागरिकांना ते किती वर्षे वापरायाला मिळतात हे पाहणे गरजेचे आहे. जयकुमार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले असतानाही त्याला काम देण्यात आले. असे प्रकार पालिकेत होता काम नये असे रवी राजा म्हणाले.
मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पाऊस पडला की मुंबई तुंबते. पावसाचे पाणी समुद्रात जाण्यासाठी ५० मिलीमीटरची क्षमता केली जात आहे. ही कामे आजही सुरु असून क्षमता वाढवल्यावरही मुंबईत पाणी तुंबते आहे याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मुंबईत ब्रिमस्ट्रोव्हेड प्रकल्प रावबवण्यात आला. तो अद्याप पूर्ण झालेला नाही. चितळे कमिटी अंमलबजावणी केल्याशिवाय पाणी साचण्याचे कमी होणार नाही. आधी २ तास पाणी तुंबत होते, आता १ तास पाणी तुंबते, पण ते पाणी का तुंबायला पाहिजे असा प्रश्न उपस्थित करत गतीने ही कामे पूर्ण केली पाहिजेत असे रवी राजा म्हणाले.
पालिकेच्या रुग्णालयांचे नुतनीकरणासाठी 'हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर सेल' नावाची नवीन घोषणा करण्यात आली आहे. या सेलची घोषणा करण्यात आली असली तरी त्यासाठी कर्मचारी अधिकारी नाहीत. गेल्या काही वर्षात अनेक रुग्णालयांच्या नूतनीकरण, पुनर्विकास अशा कामांची सुरुवात करण्यात आली. मात्र एकाही रुग्णालयाचे काम सुरु झालेले नाही. पालिकेच्या रुग्णालयात लाखीव नागरिक उपचारासाठी येतात. त्यांना चाचण्या बाहेरून कराव्या लागतात, औषधे बाहेरून घ्यावी लागतात ही परिस्थिती बदलली पाहिजे त्यासाठी नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा दिली पाहिजे असे रवी राजा म्हणाले.
No comments:
Post a Comment