भाजपाच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी पालिका शाळांमध्ये गीता पठण करावे अशी ठरावाची सूचना मांडली आहे. यावर बोलताना, गीता पठणचा प्रस्ताव आम्हाला अद्याप आलेला नाही. लहान मुलांमध्ये सुद्धा तुम्ही राजकारण आणणार का ? असा प्रश्न उपस्थित करत कारण नसताना धार्मीक वाद निर्माण करू नका असे आवाहन महापौरांनी केले आहे.
गीता हे सर्वोच्च असून त्या गीतेच उच्च स्थान आमच्या हृदयात नव्हे तर आमच्या कर्मात आहे. कुठलाही प्रस्ताव अद्याप महानगरपालिकेच्या पटलावर नसतानाही चर्चा करणे योग्य नाही. याचे राजकारण करण्यासाठी लहान मुलांनाही सोडले जात नाही. या राजकारणातून तुम्ही नक्की तरुण पिढीला काय संस्कार देता आहात हे कळते आहे. त्यामुळे या गोष्टीवर यानंतर मी बोलणार नाही. याबाबतचा प्रस्तावच आलेला नाही, फक्त पत्र दिले, फोटो काढले आणि व्हायरल केले, अशा पद्धतीने चर्चेत राहणे योग्य नसल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
गीता पठणाबाबत शिवसेनेच्या भूमिकेचे आम्ही नंतर सांगू, आता गरज नाही. तुम्ही आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही. कारण नसताना हिंदू मुस्लिम वाद तयार करायचा. सतत याच्यावर कारण नसताना बोलत राहायचे हे योग्य नाही. मुंबई, महाराष्ट्राला आणि देशाला अस्थिर करण्यासारखे हिंदुत्व नाही, हिंदुत्व हे स्थिर आहे, असे महापौर यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment