कुर्ला येथे इमारतीचा सज्जा कोसळून एकाचा मृत्यू - तीन जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 February 2022

कुर्ला येथे इमारतीचा सज्जा कोसळून एकाचा मृत्यू - तीन जण जखमी



मुंबई - कुर्ला पश्चिम येथील राम मनोहर लोहिया मार्गावरील शॉपिंग सेंटरच्या पहिल्या माळ्याचा सज्जाचा भाग तळमजल्यावर असलेल्या उपहारगृहावर कोसळून अफान खान (५) या चिमुकळ्याचा मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी पावणे तीनच्या दरम्यान ही घटना घडली. 

कुर्ला पश्चिम, राम मनोहर लोहीया मार्ग, हायटेक परिसर, विनोबा भावे पोलीस स्थानका जवळ म्हाडाची तळमजला अधिक एक अशी दुमजली इमारत आहे. शॉपिंग सेंटरच्या पहिल्या माळ्याचा सज्जाचा भाग तळमजल्यावर असलेल्या उपहारगृहावर पडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका, एल विभाग इमारत विभागाचे कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. या दुर्घटनेत पाच वर्षाचा चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या ३ जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.  

जखमींची नावे - 
१) रफिक शेख ( ४६) 
२) इरफान खान ( ३३) 
३) मोहमद जिकरान (६) 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad