मुंबई - नरिमन पॉईंट येथे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीर रित्या बांधण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यालय अनधिकृत असल्याने त्यावर मुंबई महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास पालिकेत आंदोलन करू असा इशारा कांबळे यांनी दिला आहे. (BJP's Maharashtra Pradesh office is unauthorized, the municipality should break it)
मंत्रालयाजवळ भारतीय जनता पक्षाचे कार्यालय आहे. हे कार्यालय बेकायदेशीर पणे उभारले असल्याने ते अनधिकृत आहे. त्यामुळे त्या कार्यालयावर कारवाई करून ते हटवावे अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. मुंबईत अनेक झोपड्यांवर कारवाई केली जाते मग भाजपाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई का केली जात नाही, भाजपाच्या अनधिकृत बांधकामाला पालिकेने संरक्षण दिले आहे का असा प्रश्नही कांबळे यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे कार्यालय बेकायदेशीर रित्या बांधण्यात आले आहे. यामुळे त्यावर कारवाई करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र दिले आहे. पालिकेने हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित तोडावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment