मुंबई - विक्रोळी (पूर्व) परिसरातील नामदेवराव पाटणे मार्ग या रस्त्यावरील विविध १७ गाळ्यांच्या पुढच्या बाजूस अवैध व वाढीव बांधकामांवर पालिकेने धडक कारवाई केली. या अवैध बांधकामामुळे सदरच्या रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याने वाहतुकीस वापरता येत नव्हता. विशेष म्हणजे नामदेवराव पाटणे मार्ग स्थित सदरहू १७ गाळ्यांना मध्य रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरण दरम्यान बाधित होत असल्या कारणाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत पर्यायी सदनिका उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, या सदनिकांचा ताबा मिळाल्यानंतर देखील या जागा पुन्हा अतिक्रमित करण्यात आल्या होत्या.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाने तीन वेळा नोटीस देऊन सुनावणीही घेण्यात आली. मात्र, यानंतरही संबंधितांनी अनधिकृत बांधकामे स्वतःहून न हटविल्याने या अवैध बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई ‘परिमंडळ ६’ चे उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात व ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. येथील १७ अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करून हटविण्यात आली. यामुळे संबंधीत विकास नियोजन रस्त्याचे रुंदीकरण प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली.
No comments:
Post a Comment