मुंबई - शहरात आगीचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. याकडे लक्ष वेधून अग्निशमन दलाची क्षमता व पायाभूत सुविधा अद्ययावत करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात यंत्र व संयंत्रांकरीता ३०० कोटी तसेच अग्निशमन केंद्र बांधण्याकरीता ६५.५४ कोटीची तरतूद प्रस्तावण्यात आली आहे. (300cr to fire brigade)
मुंबई शहरात वाढणारी लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांवर ताण येतो आहे. त्या दाटीवाटीच्या वसाहती, मोकळ्या जागा विविध बांधकामांनी भरल्या आहेत. त्यामुळे आगीच्य़ा घटना घडल्यास त्यावर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाने विविध उपाययोजना आखत आहे. अग्निशमन दलाची क्षमता व पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. २०२२-२३ वर्षाकरीता महत्वाचे प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. यात ठाकूर व्हिलेज येथील अग्निशमन केंद्रात ड्रील टॉवर कम मल्टी युटीलीटी ट्रेनिंग सिम्युलेटर्सची बांधणी, अग्निशमन, निरीक्षण व मूल्यांकनाकरीता फायर ड्रोनची खरेदी, डिजास्टर रिकव्हरी साईटची उभारणी, मिनी फायरस्टेशनची उभारणी, जलद प्रतीसाद वाहनांची खरेदी, फायर रोबोटची खरेदी, विद्युत वाहनांची खरेदी, जुनी कालबाह्य झालेली वाहने बदलणे आदी प्रकल्प हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात अग्निशमन दलाची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment