मुंबई - सुपर मार्केट, वॉक इन स्टोअर्स आणि 1000 चौरस फुटांपेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही जनरल स्टोअर्स मध्ये राज्य सरकारने वाइन विक्रीला परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राज्यातील राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला आणि फळांना योग्य भाव मिळण्यासाठी, फळांपासून वाईन तयार केल्यास त्याला अधिक दर मिळतो. हे गेल्या काही वर्षांमध्ये लक्षात आल्यामुळे राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यातील वाइन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. वाईन विक्रीच्या या नव्या धोरणावर राज्यभरातून काय प्रतिक्रिया उमटतात याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपची सत्ता असलेल्या हिमाचल आणि गोवा या राज्यांमध्येही अशाच प्रकारचे धोरण यापूर्वी राबवले गेले आहे. त्याला अनुसरूनच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्याचा नैतिक अधिकार भाजपाला नाही असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment