मुंबई - मालाड येथील मैदानाला टिपू सुलतान असे नाव महापालिकेने दिलेले नाही. ही जागा कलेक्टरची आहे. जे नाव दिलेच नाही त्यावरून वाद कशाला असा प्रश्न उपस्थित करत मुंबईला अस्थिर आणि अशांत करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. मालाड येथील मैदानावर पालिकेचा कोणताही फलक किंवा लोगो लावलेला नाही असे स्पष्टीकरण महापौरांनी केले. (This is an attempt to destabilize Mumbai - Mayor)
मुंबईमधील दोन रस्त्यांना टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावेळी स्थापत्य समितीच्या अध्यक्ष पदावर भाजपाचे विठ्ठल खरटमोल व कृष्णा उर्फ महेश पारकर होते. विठ्ठल खरटमोल हे सूचक तर आताचे आमदार अमित साटम हे अनुमोदक होते. त्यांनी येऊन पालिकेचे रेकॉर्ड तपासावेत असे आवाहन महापौरांनी केले. भाजपाने मुंबईमधील रस्त्यांना टिपू सुलतान यांचे नाव दिले त्यावेळी त्यांनी विरोध केला नाही मग आताच विरोध का. २०१९ नंतरच विरोध सुरू झाला का असे महापौरांनी उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment