मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने निवडणुकीसाठीची आवश्यक तयारी जवळपास पूर्ण केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ प्रभाग वाढीस मंजुरी दिल्यानंतर २३६ प्रभागांचा आराखडा तयार करत निवडणूक आयोगाला सादर केला आहे. यानंतर त्यावर निवडणूक आयोग हरकती सूचना मागवणार आहे. हरकती सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यात काही बदल असेल तर निवडणूक आयोग पुन्हा सुधारित आराखडा तयार करण्यासाठी मुंबई महापालिका सूचना करणार आहे. सुधारित आराखडा महिनाभरात पुन्हा निवडणूक आयोगाला सादर केला जाईल, असेही काकाणी म्हणाले.
निवडणूकपूर्व कामांची पालिकेची तयारी -
मुंबई महानगरपालिकेची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, बहुतांश वेळा निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली आहे. त्यामुळे पालिकेची मुदत संपण्यापूर्वी निवडणूकपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी पालिका वेगाने कामाला लागली आहे. वाढीव प्रभागांसह सर्व बाबींचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
आराखड्यात काय -
पालिकेने सादर केलेल्या आऱाखड्य़ात मतदार यादी, मतदार केंद्र, पोलिंग स्टेशन, बुथ, कर्मचारी संख्या याबाबतचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment