घराचा भाग कोसळून कुर्ल्यात एका महिलेचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 January 2022

घराचा भाग कोसळून कुर्ल्यात एका महिलेचा मृत्यू



मुंबई - कुर्ला येथे एका घराचा काही भाग कोसळून आज एका ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कालच मुंबईमध्ये कमला इमारतीला आग लागून ६ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच यामुळे मुंबईमध्ये नेहमीच कोणत्यातरी दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार एसबी बर्वे मार्ग, आंबेडकर नगर येथील पालिकेच्या अंजुमन इमारतीजवळ सकाळी १०.३० च्या सुमारास एका घराचा काही भाग बाजूच्या घरावर कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली एक महिला अडकली होती. तिला मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून कुर्ला नर्सिंग होम या रुग्णालयात दाखल केले. मात्र या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या मृत महिलेचे नाव लता रमेश साळुंखे असून ती ५३ वर्षाची असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad