अजूनही कोरोना संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच येत्या वर्षात ३ जानेवारीपसून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरूवात होईल अशी घोषणा त्यांनी केली. तसेच आरोग्य कर्मचार्यांना १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार असून ६० वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस देण्यात येईल असेही मोदी या वेळी म्हणाले.
सर्व नियमांचे पालन करणे हे कोरोनाशी लढण्याचे एक महत्त्वाचे हत्यार आहे, तसेच लसीकरण हे दुसरे हत्यार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरूवात झाली होती, आज देशातील १४१ कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. ६१ टक्क्यांहून अधिक प्रौढ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तसेच देशातील प्रौढांपैकी ९० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डो देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
देशात अजूनही कोरोना गेलेला नाही, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण निरंतर प्रयत्न केले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणाले. तसेच संशोधकांच्या सूचनेनंतरच दोन लसीनंतरच अंतर ठेवण्यात आले होते. ज्यांना कोरोना झाला त्यांना लस कदी देण्यात येणार अशा अनेक प्रकारचे महत्त्वाचे निर्यण घेण्यात आले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय फार महत्त्वाचे ठरले. सध्या ओमिक्रॉनची दहशतत आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment