मुंबई - राज्याचे पर्यावरण व पर्यटक विभागाचे मंत्री व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना व्हाट्सअपवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला सायबर पोलिसानी बेंगलुरु वरुन अटक केली आहे. तो स्वतःला दिवंगत अभिनेता सुशांत सिंगचा फॅन म्हणत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना 8 डिसेंबर रोजी मध्यरात्री एका व्यक्तीने व्हाट्सअपवर मैसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्युबाबत ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. याबाबत आदित्य ठाकरे यांनी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार तपास करून धमकी देणाऱ्याला सायबर पोलिसानी बेंगलुरु येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जयसिंह राजपूत असून तो स्वतःला सिनेअभिनेता सुशांत सिंगचा फॅन म्हणत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
No comments:
Post a Comment