Corona - राज्यात तिसरी लाट, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2021

Corona - राज्यात तिसरी लाट, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर


मुंबई - राज्यात कोरोनाची (corona) तिसरी लाट (third wave) आली असून आपण लॉकडाऊनच्या (Lockdown) उंबरठ्यावर आहोत. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार आहे. लॉकडाऊन लावण्याची वेळ आल्यास शाळा, कॉलेज, लोकल ट्रेन (school, local train) अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. 

राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. “तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. सध्याची रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही,” असे विजय वडेट्टिवार म्हणाले.

राज्यात कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून सभा, समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे असतानादेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. याच कारणामुळे वडेट्टीवार यांनी कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले. तसेच लॉकडाऊनची वेळ आलीच तर ट्रेन, लोकल आणि इतर सुविधांवर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad