मुंबई - ओमायक्राॅन'सह काेराेना विषाणूंचे उपप्रकार वाढत आहेत. त्यामुळे पालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटर सतर्क आणि सुसज्ज ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. सर्व रुग्णालयांमधील आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा, रुग्णखाटा, रुग्णवाहिका, रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार विषयक बाबी, आॅक्सिजन आैषधे-गोळ्या-इंजेक्शन्सचा साठा आदी सर्व बाबींचा आढावा घेऊन यंत्रणा अद्ययावत करा अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
काेराेना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, आज पालिका मुख्यालयात पालिका आयुक्तांनी विशेष बैठक बाेलावली हाेती. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) . पी. वेलरासू, अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सह आयुक्त (शिक्षण) अजीतकुमार कुंभार, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त रमाकांत बिरादार व संजय कुऱ्हाडे, अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्यासह आराेग्य विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते. गेल्या काही दिवसात कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आपण अत्यंत सजग व सतर्क राहून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले.
उपाययाेजना -
काेराेना उपचार केंद्रांसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या; तसेच ज्या रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यात आल्या होत्या, त्याविषयीची माहिती अद्ययावत व सुधारित करा, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनच्या साठ्याच्या उपलब्धतेबाबत कार्यवाही करा, मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई तीव्र करा, , रुग्णखाटा, रुग्णवाहिका, रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार विषयक बाबी, औषधे-गोळ्या-इंजेक्शन्स साठा इत्यादी सर्व बाबींचा आढावा घेऊन संभाव्य गरजेनुसार सदर बाबी अद्ययावत करण्याचे निर्देश., वाॅर रूम पुन्हा सज्ज ठेवा, २४ विभागांमध्ये विभागांच्या स्तरावर सर्वंकष आढावा घेऊन सूक्ष्म स्तरीय नियोजन, रुग्णालयांमधील प्रत्येक ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे व योग्य प्रमाणात पोहोचवा, नागरिकांनी आपल्या विभागाच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा.
रुग्णालये, खाटा सज्ज ठेवा -
'ओमायक्राॅन'सह कोरोना विषाणूंच्या व्हेरियंटच्या संभाव्य प्रसाराची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड रुग्णालये यांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने सर्व रुग्णालयांमधील आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा, रुग्णखाटा, रुग्णवाहिका, रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार विषयक बाबी, औषधे-गोळ्या-इंजेक्शन्स साठा अद्ययावत करण्याचे निर्देश.
लक्षणे असल्यास चाचण्या करा -
कोविड बाधा झाल्याची चाचणी लवकरात लवकर होणे हे रुग्णाच्या दृष्टीने तसेच कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कोविड चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. ज्यांना कोविडची लक्षणे असतील, त्यांनी कोविड चाचणी केंद्रात जाऊन कोविड चाचणी करुन घ्यावी. या चाचणी केंद्राची माहिती 'वॉर्ड वॉर रुम'द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या विभागाच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
पालिकेला सहकार्य करा -
'ओमायक्राॅन' या कोविड विषाणूच्या व्हेरियंटच्या प्रसाराची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे व ठामपणे करण्यात येत आहेत. यामुळे मुंबईकर नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. यामुळे 'कोविड' प्रतिबंधाच्या दृष्टीने आणि व्यापक जनहिताच्या दृष्टीने हे गरजेचे असल्याने नागरिकांनी व सर्व संबंधितांनी यासाठी परिपूर्ण सहकार्य करावे; असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment