मुंबई - मुंबईत कोरोनाबरोबर ओमायक्राॅन या नव्या विषाणुचाही झपाट्याने प्रसार होत आहे. रविवारी आणखी २७ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत एकूण ओमायक्राॅन बाधित रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३४ रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रविवारी राज्यात ३१ ओमायक्राॅन विषाणुचे रुग्ण आढळले यापैकी तब्बल २७ रुग्ण मुंबईतील आहेत.
मुंबईत ओमायक्राॅन विषाणुचाही झपाट्याने प्रसार होत आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून ओमायक्राॅन बाधित मुंबईतील २७ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. या सगळ्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. २७ पैकी १५ रहिवासी मुंबईबाहेरील असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. हे रुग्ण पॅरिस, दुबई, टांझानिया, केनिया, जर्मनी, युएई, लंडन, दोहा, नायरोबि या रिक्स कंट्रीज मधून आले आहेत.
No comments:
Post a Comment