मुंबई - मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला होता. तसे नियोजनही शिक्षण विभागाने केले आहे. मात्र डोंबिवलीत ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पालक मुलांना शाळांत पाठवण्यास तयार होतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने राज्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. तर मुंबई तसेच ठाणे, पुण्यातील शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने जाहिर केला आहे. मात्र जगभरात ओमाय क्रॉन झपाट्याने पसरत असून आता महाराष्ट्रातही ओमायकॉनचा शिरकाव झाला आहे. शनिवारी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत पहिला रुग्ण सापडल्याने चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्यावर संभ्रमता निर्माण झाली आहे. ओमायक्रॉनच्या धास्तीने पालक मुलांना शाळेत पाठवण्यासाठी किती तयार होतील हा प्रश्न असल्याने १५ डिसेंबरला शाळा सुरु केल्या जाणार का यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय जाहिर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment