मुंबई - येत्या १०-१५ दिवसात राज्यातील पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळांबाबत अंतीम निर्णय होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालच्या बैठकीत सर्व शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरु लागल्यानं शाळा सुरु करण्याबाबत महत्वाची चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेवरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर येत्या काही दिवसात शाळांबाबत टास्क फोर्स बरोबर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सध्या सुरु झालेत. पण पहिलीपासून वर्ग सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षक, शाळाचालक, पालकही आग्रही दिसत आहेत.
No comments:
Post a Comment