मुंबई दि. २२ नोव्हेंबर - 'सत्यमेव जयते' (Satyamev Jayte) असं बोलत उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्णयाचे स्वागत करताना कुणी गैर करत असेल कोण अन्याय करत असेल तर त्याविरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार आहे असे स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे.
समीर दाऊद वानखेडे (Sameer Wankhade) याच्या वडिलांनी नवाब मलिक यांना कुटुंबाच्या विरोधात बोलण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती परंतु उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्यापासून रोखता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. या देशामध्ये बोलण्यावर बंदी कुणी घालू शकत नाही. जर एखादी व्यक्ती जबाबदारीने बोलत असेल तर प्रत्येक नागरिकाचा तो मौलिक अधिकार आहे परंतु काही लोकांना हे कळलं नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
No comments:
Post a Comment