मुंबई-१३-(प्रतिनिधी) - भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात भारतातील स्वातंत्र्य सैनिकांचा व स्वातंत्र्याचा अपमान केल्या प्रकरणी सिने अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचा पद्मश्री पुरस्कार त्वरीत काढून घ्यावा या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने आज राज्यभरातील पोलीस ठाण्यात निवेदने देवून आपला निषेध नोंदवला.
भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दिपक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले ऋषी पोळ भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र राहाता तालुका अध्यक्ष सुनील मोकळ व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील स्वातंत्र्य सैनिकांबद्दल तसेच स्वातंत्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारी सिने अभिनेत्री कंगना राणावत हीच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने नवी मुंबई पोलीस ठाणे येथे जिल्हाप्रमुख पी एस पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
औरंगाबाद येथे भीम आर्मी महाराष्ट्र उपाध्यक्ष बलराज दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली बाळूभाऊ वाघमारे. निखिल खरात व पदाधिकारी यांनी स्थानिक पोलीस ठाणे येथे निवेदन दिले मुंबईत कार्याध्यक्ष अविनाश गरूड उपाध्यक्ष दिनेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त, चेंबूर पोलीस ठाणे मानखुर्द पोलीस ठाणे आदी ठिकाणी निवेदने देण्यात आली. यावेळी मुंबई तील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने देशविरोधी वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशन नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अंकीत राऊत आणि आझाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ चाचेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गिट्टीखदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुहास चौधरी यांच्या कडे तक्रार दाखल केली.त्यावेळी पश्चिम नागपूर अध्यक्ष आमिर भाई शेख, चंद्रकांत भालेराव,बबलू गजभिये, शुभम उईके, सुशिल वाहाणे, शुभम दामले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment