मुंबई - विराेधी पक्षाच्या भुमिकेत असलेला भाजपा आक्रमक झाला असून आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेवर आराेप करीत शिवसेनेला घायाळ करू लागला आहे. भाजपाच्या आराेपांना प्रत्यत्तर देताना आणि विराेधकांचे मुद्दे खाेडताना शिवसेनेची दमछाक हाेत असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यांच्या निविदेतील घाेटाळा, बेस्ट डिजिटल तिकीट निविदांमधील घाेटाळा, पूर नियंत्रण निविदेतील घाेटाळा, एसटीपी घाेटाळा, घाेटाळा असे पाठाेपाठ आराेप भाजपने केले आहेत. या आराेपांना जशास तसे उत्तर शिवसेनेला देता आलेले नाही. आता पालिकेतील सफाई कामगारांच्या घरांच्या आश्रय याेजनेत 1844 काेटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आराेप भाजपाने शिवसेनेवर केला आहे. मात्र हा आराेप निराधार असल्याचे स्पष्ट करून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ताे फेटाळला. सफाई कामगारांच्या घरासाठीची आश्रय याेजना आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास याेजना या दाेन्ही याेजना वेगवेगळ्या असून ही याेजना बंद व्हावी आणि कामगारांना घरे मिळू नयेत असा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आराेप जाधव यांनी केला आहे. निवडणुकीच्या ताेंडावर भाजपा आणि शिवसेनेत जुंपली आहे.
घरांचा प्रश्न चिघळण्याची शक्यता
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या संदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेतील भाजपाचा गट कटिबद्ध झाला आहे. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना नावाने सुरु झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासन आणि महापालिकेने करण्यासाठी आणि सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळवून देण्यासाठी भाजपा आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार अशी भुमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची आता कसाेटी
भाजपा आता सफाई कामगारांच्या घराच्या प्रश्नावर आक्रमक झाला आहे. भाजपाने सेनेवर थेट घाेटाळ्याचा आराेप केल्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. पालिका निवडणुकीच्या ताेंडावर भाजपने उचललेल्या या कामगारांचा विषय शिवसेनेला मार्गी लावावा लागेल, शिवसेनेसाठी ही कसाेटी असल्याची चर्चा पालिका वर्तूळात आहे.
No comments:
Post a Comment