परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना ट्रेनने प्रवासाची मुभा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2021

परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना ट्रेनने प्रवासाची मुभा



मुंबई, दि.30 :- सक्षम प्राधिकाराच्या वतीने आयोजित कोणत्याही परीक्षेसाठी परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना लोकल रेल्वेने एका दिवसासाठी प्रवास करण्याची मुभा द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे.

कोणत्याही परीक्षेत सहभागी होणारे तसेच परीक्षेचे काम पाहण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मासिक पासऐवजी एका दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट देण्यात यावे. आवश्यक असल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची तपासणी करून तिकीट देण्यात यावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad