मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी हाेणार्या प्रभागांच्या फेररचनेकडे सर्वांचे डाेळे लागले आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून 2017 सालच्या जुन्या प्रभाग फेररचनेच्या बातम्या आणि मॅसेज साेशल मिडियावर व्हायरल हाेवू लागल्याने राजकीय पक्ष आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग फेररचनेबाबत अद्याप काेणत्याही सुचना पालिकेकडे आल्या नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
काेराेनामुळे पालिकेची निवडणुकीबाबत अनिश्चितता हाेती. आता काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निवडणूक घेण्याला राज्य निवडूक आयाेगाने संमती दिली आहे. राजकीय पक्षांनी निवडणूकीच्या तयारीला लागा, असे संकेत आयाेगाने सर्वच राजकीय पक्षांना दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीला राजकीय पक्षांना सामाेरे जावे लागणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अजूनही प्रभागांच्या फेररचनेबाबत गाेंधळ सुरू आहे. प्रभागांची फेररचना हाेणार की नाही अशी संभ्रमाची अवस्था सद्या राजकीय पक्षांमध्ये दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून प्रभाग फेररचनेचा जुना मॅसेज व्हायरल हाेवू लागल्याने या गाेंधळात भर पडली आहे.
गेल्या २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांची पुनर्रचना करताना भाजपाने निवडणुका सोयीच्या होतील अशा पद्धतीने प्रभागांची पुनर्रचना केल्याचा आराेप पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांना पत्र पाठवून केला हाेता. त्यामुळे ४५ प्रभागांच्या भौगोलिक रचनेत सुधारणा करण्याची विनंतीही त्यांनी निवडणूक आयाेगाला केली हाेती. शिवसेनेने मुंबईतील ३० प्रभागांच्या पुनर्रचनेची मागणी केली आहे. प्रभाग फेररचना करायची झाल्यास त्यासाठी हरकती सुचनांसाठी कालावधी लागेल. अजूनही तीन महिन्यांचा कालावधी असल्याने फेररचनेबाबतच कधीही सुचना मिळू शकतील अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
अद्याप सुचना आल्या नाहीत -
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभागांची फेररचना हाेण्याची शक्यता आहे. त्याबाबत अद्याप काेणत्याही प्रकारच्या सुचना निवडणुक आयाेगाकडून पालिकेकडे आल्या नसल्याची माहिती पालिकेच्या चिटणीस (प्रभारी) संगीता शर्मा यांनी दिली.
No comments:
Post a Comment