मुंबई,-२६-(प्रतिनिधी )- चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते यांचा राज्य्सातारीय मेळावा मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत संपन्न होत आहे. प्रस्तावित राज्य स्तरीय जन जनजागृती सन्मान यात्रेसंदर्भात या बैठकीत अंतिम निर्णय होणार असून चंद्रशेखर आझाद यांच्या महाराष्ट्रात जाहीर सभांच्या नियोजनावर या मेळाव्यात शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
दादर पश्चिम वीर कोतवाल गार्डन जवळील शिवाजी मंदिर येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात सकाळी १ ते सायंकाळी ५ या वेळेत हा कार्यक्रम होत आहे भीम आर्मीची महाराष्ट्र राज्याची पुढील वाटचाल तसेच राज्यभर प्रस्तावित संविधान जागृती याञेचे पुढील नियोजन आदी बाबत या मेळाव्यात संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांकडून मार्गदर्शन करून हि यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. सदर यात्रेदरम्यान चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या जाहीर साभांचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात मंञालयातील ज्येष्ठ सेवानिवृत्त सनदी अधिकारी सी के जाधव यांनी गॅझेट करून बौध्द धम्म स्वीकारल्याबद्दल त्यांचा सत्कार तसेच भीम आर्मी पदाधिकारी यांनी स्वावलंबी कसे बनावे,यावर त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. भीम आर्मी महाराष्ट्र कमिटी, कोअर कमिटी.राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे , महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड,मुख्य सचिव सुनिल थोरात प्रमुख संघटक दीपक भालेराव, महासचिव अविनाश गायकवाड, आदी पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment