मुंबई विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन गारेगार प्रवास - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2021

मुंबई विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन गारेगार प्रवास



मुंबई - बेस्ट उपक्रमाने १ नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन पूर्व दरम्यान थेट वातानुकूलित बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन पूर्व किमान ५० रुपये तर कमाल १२५ रुपये तिकीट आकारले जाणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दक्षिण मुंबईत सुरु केलेल्या वातानुकूलित बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर विमानतळ ते वाशी बोरिवली दरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरु केली. आता १ नोव्हेंबरपासून विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन पूर्व दरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.
विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन पूर्व दरम्यान धावणारी बस साकीनाका, मरोळ नाका, पवई उद्यान, जोगेश्वरी लिंक रोड कांजूर, पूर्व द्रुतगती मार्ग, तीन हात नाका, कॅडबरी जंक्शनवर चालवण्यात येणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्य़ात आले.

अशा असतील बस फेऱ्या -
विमानतळ - सकाळी ७.३०, ८.३०, ९.३०
संध्याकाळी - ५, ६ व ७ वाजता
कॅडबरी जंक्शन - सकाळी - ६, ७ व ८ वाजता
संध्याकाळी - ३.२५, ४.२५ व ५.२५ वाजता

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad