मुंबई दि. २५ ऑक्टोबर - 'पहचान कौन' असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन आणखी खळबळ उडवून दिली आहे. तर 'यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा' असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर करुन फर्जीवाडयाची पोलखोल केली आहे.
एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हे पत्रकार परिषद घेत समोर आणले होते. आज ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
No comments:
Post a Comment