मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसाठी काम करणाऱ्या नांदी फाउंडेशन व के. सी. महिंद्रा एज्युकेशनल ट्रस्ट समाजकार्याचा भाग असलेल्या 'नन्ही कली' या उपक्रमाच्यावतीने गुणवंत विद्यार्थिनींना गौरवण्यात आले. यावेळी सुबोध मिश्री, आरिफा शेख, महेंद्र सावत्, ज्ञानेश्वर हेडणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते मुलींचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत नांदी फाउंडेशन ही संस्था त्यांना पूर्ण सहकार्य करते. दहावीत नव्वदी पार टक्केवारी मिळालेल्या मुलींची भरारी मारण्याचे स्वप्न ऐकलं. त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. शेवटी तुम्ही कुठे राहता, तुमचा भूतकाळ काय आहे, यापेक्षा तुमच्या स्वप्नांमध्ये किती ताकत आहे व ती पूर्ण करण्यासाठी तुमची जिद्द काय आहे. हे महत्त्वाचे आहे. हजारो मुलींमध्ये हे चिंतन जगण्याचं, त्यांच्या स्वप्नांना आकार देण्याचं काम "नन्ही कली" उपक्रमाअंतर्गत प्रामाणिकपणे करते हे बघून अभिमान वाटतो असे सुबोध मिश्री म्हणाले. तुमची आवड कशात आहे याचा शोध कसा घायचा व त्यातच तुमचे करिअर कसे करायचे याचे मार्गदर्शन करिअर मार्गदर्शक सुबोध यांनी केले.
यावेळी २०२० -२१ मधील गुणवंत 'नन्ही कली'ना मान्यवरांच्या रस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नन्ही कलीच्या समन्वयक अनिसा अन्सारी, जास्मिन सम्मद यांनी तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी जयश्री गायकवाड यांनी केले. नन्ही कलीच्या समन्वयक सुनिता शर्मा, श्रुती चव्हाण, निकिता मोरे, स्वप्नाली भुवड, लाना चव्हाण, माधुरी कांबले या सर्व समन्वयकच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न झाला.
No comments:
Post a Comment