दीर्घकाळ कामामुळे हृदयरोग -
हा अहवाल लोकांना जागे करणारा असेल अशी आशा बाळगून डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले, इतक्या लोकांना त्यांच्या नोक-यांमुळे अक्षरश: मरताना पाहणे धक्कादायक आहे. या अभ्यासात १९ व्यावसायिक जोखीम घटकांचा विचार केला आहे. ज्यात दीर्घ कामकाजाचे तास, कामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण, दमा, कार्सिनोजेन्स आणि आवाजाचा समावेश आहे. त्यात असे दिसून आले की कामाशी संबंधित मृत्यूंची संख्या असमान प्रमाणात आग्नेय आशिया आणि पश्चिम पॅसिफिकमधील कामगारांमध्ये, पुरुषांमध्ये आणि ५४ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आहे. दीर्घ काळ काम करण्यामुळे झालेल्या हृदयरोगाचा परिणाम म्हणून वर्षाला अंदाजे ७ लाख ४५ हजार लोक मृत्यूमुखी पडत होते, या जागतिक आरोग्य संघटनेच्या जुन्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर हा नवा अभ्यास करण्यात आला आहे. शुक्रवारी प्रकाशित झालेल्या व्यापक अहवालात असे आढळून आले की कामाच्या ठिकाणी वायू प्रदूषणही जीवघेणे ठरत आहे.
हवामान बदलाचा परिणाम नाही -
२०१६ मध्ये वायू प्रदूषणामुळे ४ लाख ५० हजार जण मृत्यूमुखी पडले तर दुखापतीमुळे ३ लाख ६० हजार लोक मारले गेले. जागतिक आरोग्य संघटनेचे तांत्रिक अधिकारी फ्रँक पेगा म्हणाले की, हवामान बदलाशी संबंधित वाढत्या उष्णतेसह इतर मृत्यूंचा सध्या समावेश करण्यात आलेला नाही आणि कोविड १९ सारख्या संसर्गजन्य रोगांचाही समावेश नाही. सदर अहवाल लोकांना जागे करणारा असून, अशी आशा बाळगून डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी कामाचे ठिकाण आणि कामगार यामध्ये समन्वय साधून एकप्रकारे जनजागृती करावी असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment