खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीच्या वॉचमनने १० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान कंट्रोल रुमला फोन करून इथे एका बाईला मारहाण सुरू आहे, असे सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवले. संबंधित अधिकारी १० मिनिटाच्या आत तिथे पोहोचले. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली. त्यावेळी पोलिसांनी जागेवर निर्णय घेऊन त्या महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी हवालदाराने वॉचमनकडून घेऊन पोलिसांनी टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरू केले. त्यानंतर चौकीदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही. ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेले आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त हेमंत नगराळें यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment