गणेशोत्सव - दीड दिवसाच्या ४१ हजार २७७ मूर्त्यांचे विसर्जन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 September 2021

गणेशोत्सव - दीड दिवसाच्या ४१ हजार २७७ मूर्त्यांचे विसर्जन


मुंबई - शुक्रवारी १० सप्टेंबरला गणेशाचे आगमन झाले. काल शनिवारी दीड दिवसाच्या गणेश मूर्त्यांचे रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. नैसर्गिक व कृत्रिम तलावात रात्री १२ वाजेपर्यंत ४१ हजार २७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. कृत्रिम तलावात २४ हजार २६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

मुंबईच्या चौपाट्या, नैसर्गिक टाळा आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरूवात झाली. त्यामुळे चौपाट्या आणि सार्वजनिक तलाव भाविकांनी फुलून गेल्या होत्या. रात्री १२ वाजेपर्यंत ४१ हजार २७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ३९५ सार्वजनिक, ४०८६४ घरगुती तर १८ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या एकूण ४१ हजार २७७ मूर्तीपैकी कृत्रिम तलावात २४ हजार २६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात २८३ सार्वजनिक, २४२६९ घरगुती तर १५ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान भाविकांना थेट पाण्यात जाऊन विसर्जन करण्यास बंदी असल्याने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad