मुंबईला पाणी पुरविणार्या तलावांमध्ये 80 टक्के जलसाठा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2021

मुंबईला पाणी पुरविणार्या तलावांमध्ये 80 टक्के जलसाठा



मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तलावांमध्ये 80 टक्के जलसाठा असून हा जलसाठा मुंबईकरांना 303 दिवस पुरेल इतका आहे. तलावांच्या पाणलाेट कक्षेत्रात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे तलावांच्या पातळीत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. तलावांची पातळी वाढू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे.

तुळशी, विहार, माेडकसागर आणि तानसा हे तलाव भरले असून उर्वरित अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा ही माेठी धरणे अजूनली भरायची आहेत. सद्या असलेला जलसाठा पुढील दहा महिने पुरेल इतका असून तलाव कक्षेत्रात पावसाचा जाेर कमी झाला असला तरी पाणलाेट क्षेत्रात पावसाच्या सरी अधूनमधून पडत आहेत. त्यामुळे जलसाठ्याचे समाधानकारक चित्र असल्याचे जलअभियंता खात्याने सांगितले. मुंबईत सद्या पावसाने थाेडी उसंत घेतली आहे. त्यामुळे वातावरणातील उकाडा वाढला आहेत. पावसाळ्याचा अजून एक महिना शिल्लक आहे. उर्वरित धरणे या काळात भरून वाहू लागतील, असा विश्वास पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.

तलाव पूर्ण भरण्याची पातळी        सद्याची पातळी (मीटरमध्ये)
अप्पर वैतरणा            603.51                       601.19
माेडक सागर             163.15                       162.62
तानसा                       128.63                       128.56
मध्य वैतरणा               283.00                       279.70
भातसा                       142.07                       135.54
विहार                          80.12                        80.18
तुळशी                       139.17                      139.17

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad