मुंबई - देशांतर्गत मुंबई ये- जा करणा-या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर बंधनकारक आहे. मात्र दिल्ली किंवा इतर ठिकाणी सकाळी जाऊन सायंकाळी परतणा-या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा ४८ तासांचा अहवाल मिळवणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा प्रवाशांना आरटीसीपीसीआर चाचणीशिवाय प्रवास करण्यास सवलत द्यावी अशी विनंती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
कोरोनाची पहिली व दुस-या लाटेत देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र दिल्ली, कर्नाटक, गुजरात, गोवा, हैद्राबाद केरळ आदी ठिकाणी अनेकजण कामानिमित्त जाताना सकाळी जाऊन सायंकाळी परतीता प्रवास करतात. यावेळी आरटीपीसीआर चाचणी करणे शक्य होत नाही. सध्या देशभरात लसीकरणावर भर देण्यात आला असून अनेकांनी लशीचे दोन डोस घेतले आहे. त्यामुळे अशा देशांतर्गत विमानाने प्रवास करणा-या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीतून वगळण्यात यावे अशी विनंती आयुक्त चहल यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment