मुंबई - मुंबईत मागील काही दिवसांपासून रोज आढळणा-या रुग्णांच्या संख्येत चढउतार कायम राहिला असून रुग्ण संख्या एक हजारच्या आत स्थिर राहिली आहे. रविवारी ५५५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून १५ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ६६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी धोका कायम आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या सातशे ते पाचशेच्या दरम्यान नोंद होते आहे. रविवारी ५५५ रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ही संख्या ५०४ वर होती.
आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख २७ हजार ६९६ वर गेली आहे. तर ७ लाख २३ हजार ७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १५६२७ वर पोहचला आहे. सद्यस्थितीत ७३५४ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मागील २४ तासांत ३४९८० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९६ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९२८ वर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
No comments:
Post a Comment