मुंबई - मुंबई महानगर पालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार असल्याने पालिकेने नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांसाठी 892 कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी 227 प्रभागांमध्ये विकास कामांचा धुमधडाका होणार सुरू होणार आहे.
प्रभागामध्ये विविध विकासकामे करण्यासाठी या विकासनिधीमधून प्रत्येक नगरसेवकाला 60 लाख रुपयांचा विकास निधी मिळाला आहे. या निधीतून लादीकरण, रस्त्यांची कामे, रस्ते दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्यांची कामे, नाल्यांची दुरुस्ती आदी नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत.
कोरोनाच्या काळात विकास कामांना मोठा फटका बसला. पहिल्या लाटेच्या काळात विकास कामांसाठी कामगार मिळणे कठीण झाले. मजूर मुंबई सोडून आपापल्या गावी निघून गेले. आता कोरोनाची भीती कमी झाल्याने विकास कामांना गती आली आहे. पालिकेच्या स्थायी समितीनेही या विकास निधीच्या वाटपाला संमती दिली आहे. नगरसेवकांना मिळणाऱ्या 892 कोटी विकास निधीतून आता विकासकाने धुमधडाक्यात सुरू होणार आहेत.
नगरसेवकांच्या मागणीनुसार विकास कामांसाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, अशी भूमिका पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मांडली आहे.
No comments:
Post a Comment