देशात जातीनिहाय जनगणना करा - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2021

देशात जातीनिहाय जनगणना करा - रामदास आठवले



मुंबई : देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

रविवारी जागतिक लोकसंख्या दिवस होता. त्यानिमित्ताने मीडियाशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी ही मागणी केली. जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ती काळाची गरज आहे, असे आठवले म्हणाले. 

जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे याची माहिती मिळेल. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. जनगणना आयोगाशीही मी बोलणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोहोचण्यास मदतच मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad