सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपतराव देशमुख यांचे निधन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2021

सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपतराव देशमुख यांचे निधन


मुंबई / सोलापूर - सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, विधिमंडळातील सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगोला तालुक्यासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.

गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील राजकारणी होते. ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून ५० वर्ष आमदार म्हणून निवडून गेले आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार गणपतराव देशमुख होते. गणपतराव देशमुख 95 वर्षांचे होते. गणपतराव देशमुख यांनी बारा वेळा विधानसभा निवडणूक जिंकली.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून बाराव्या वेळेस निवडून आले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad