मुंबई - मुंबईत लसीकरण मोहीम सुरु आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र झोपडपट्टीतील नागरिक लस घेण्यास घाबरत असल्याने त्यांना लस घेण्यासाठी जनजागृती करत प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या तब्बल २० हजार नागरिकांचा शोध घेतला जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच टाळाटाळ करणाऱ्या सुमारे २० हजार नागरिकांचा शोध पालिका घेत आहे. त्यांचा शोध घेऊन ते दुसरा डोस का घेत नाहीत याची विचारणा करून त्यांना दुसरा डोस दिला जाईल असे महापौरांनी सांगितले.
मुंबईमध्ये १६ जानेवारीपासूनकोरोना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत ३८ लाखांहून अधिक डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे ८ लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मुंबईत रोज ५० हजारांहून अधिक लसीचे डोस दिले जात आहेत. लसीकरण सुरु होऊन तब्बल ५ महिने पूर्ण व्हायला आले तरी त्याला झोपड्पट्टी विभागातील नागरिकांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. यासाठी मुंबई महापालिका झोपडपट्टी विभागातील नागरीकांना प्रोत्साहित करेल असे महापौरांनी सांगितले.
No comments:
Post a Comment