मुंबईत ब्लॅक फंगसमुळे तीन मुलांनी गमावले डोळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2021

मुंबईत ब्लॅक फंगसमुळे तीन मुलांनी गमावले डोळे



मुंबई - कोरोनातून बरे झाल्यानंतर ब्लॅक फंगसची लागण झाल्यामुळे तीन मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. ही मुले मुंबईतील दोन खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होती. त्या तिघांचे वय ४, ६ आणि १४ वर्षे आहे. विशेष म्हणजे ४ आणि ६ वर्षांच्या मुलांमध्ये मधुमेहाची कोणतीच लक्षणे नव्हती.

आतापर्यंत ब्लॅक फंगसबाबत दावा केला जात होता की, फक्त मधुमेहाच्या रुग्णांना याचा धोका असतो. पण, या दोन मुलांना ब्लॅक फंगसची लागण झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या तीन चिमुकल्यांशिवाय एका १६ वर्षीय मुलीलाही ब्लॅक फंगसची लागण झाली. डॉक्टरांना तिच्या पोटात फंगस आढळला. पण, उपचारानंतर तो ठीक करण्यात आला.

फोर्टिस हॉस्पिटलमधील सीनियर पीडियाट्रीशियन डॉ. जेसल सेठ यांनी सांगितले की, यावर्षी त्यांच्याकडे ब्लॅक फंगसचे २ रुग्ण आले. दोघेही अल्पवयीन होते. १४ वर्षीय मुलीला मधुमेह आहे, सध्या तिची प्रकृती नाजूक आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर ४८ तासांतच तिच्यात ब्लॅक फंगसची लक्षणे दिसली. फंगस तिच्या नाकापर्यंत पोहोचला होता. आम्ही तिच्यावर सहा आठवडे उपचार केला, पण दुर्दैवाने तिचा डोळा वाचवू शकलो नाही. त्याशिवाय, ४ आणि ६ वर्षांच्या चिमुकल्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा डोळा काढावा लागला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad