डोंगर उतारावर राहणा-यांना धोक्याचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2021

डोंगर उतारावर राहणा-यांना धोक्याचा इशारा



मुंबई - विक्रोळी, घाटकोपर आणि भांडुप विभागात दरडींच्या दाढेत आणि डोंगर उतारावर राहणा-यांना नागरिकांना मुंबई महापालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
 
विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभिम नगर, गौतमगर; तसेच भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी या ठिकाणच्या टेकडीच्या, डोंगराच्या उतारावर झोपड्या असून पावसाळया दरम्यान जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरुन येणा-या पावसाच्या पाण्याच्या लोंढयामुळे, जोरदार पावसाने नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महापालिका प्रशासने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad