रविवार, दि.१३- शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेतर्फे आज सुमारे ५ हजार शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना ३१ हजार वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले. या वह्यांच्या मुखपृष्ठ माध्यमातून पर्यावरण रक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्राद्वारे वृक्षसंवर्धनाचा संदेशही यावेळी देण्यात आला.
सदर उपक्रमाचे उदघाटन राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना विभागप्रमुख अनिल परब यांच्याहस्ते पार पडले. वह्या वितरणासाठी मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदिप शर्मा, हॅन्डस ॲाफ ॲक्शनचे अध्यक्ष निलेश भोसले, शिव वाहतूक सेनेचे माजी सरचिटणीस मोहन गोयल, विधानसभा संघटक सुभाष सावंत, विधानसभा समन्वयक मनोहर पांचाळ, रस्ते सुरक्षा प्रवक्ते विनय मोरे, युवासेना विभाग अधिकारी मयुर पांचाळ, शाखाप्रमुख नरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना आर्थिक संकटकाळात असंख्य पालकवर्ग बेरोजगारीला सामोरे जात असताना यामाध्यमातून त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याची भावना आयोजक मोहन गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment