मुंबई - येत्या मुंबई पालिका निवडणूकित रिपाइं (आंबेडकर) आपले उमेदवार उतरविणार असून परिस्थितीनुसार युती आघाडीचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र अध्यक्षा सुनीता चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अक्षय निकाळजे यांची मुंबई अध्यक्ष अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपाइं (आ) पक्ष आणि दीपक निकाळजे यांचा रिपाइ (आंबेडकर) या बाबत संभ्रम आहे. त्याबाबत जनजागृती करणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत आपले उमेदवार देणार असून भाजपसोबत जाणार नाही पण इतर पक्षासोबत जाण्याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ. आता विविध पक्षातून कार्यकर्ते येत आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय संघटक सुनील खांबे म्हणाले की, रिपाइं (आंबेडकर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. समाजातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. ते बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून काम करत आहेत. तर अक्षय निकाळजे म्हणाले की, आज तरुणवर्ग विविध समस्यांना सामोरे जात आहे. अशा स्थितीत पक्षाने मला जबाबदारी सोपविली आहे त्यामाध्यमातून तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल.
No comments:
Post a Comment