नवी िदल्ली - देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. देशातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र मेहनत करून रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. पण या लढाईत अनेक डॉक्टरांना आपला जीव गमावावा लागत आहे. या दुसऱ्या लाटेत देशात आतापर्यंत ७१९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक बिहार आणि दिल्लीतील डॉक्टर असल्याची मािहती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिली आहे.
कोरोनामुळे बिहारमध्ये तब्बल १११ डॉक्टरांचा तर दिल्लीत १०९ डॉक्टरांचा बळी गेला आहे. उत्तर प्रदेशात दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ७९ आणि पश्चिम बंगालमध्ये ६३ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेत देशात एकूण ७४८ डॉक्टरांना आपला जीव गमावावा लागला होता. डॉक्टरांच्या मृत्यूत सर्वाधिक ३० ते ५५ वयोगटातील डॉक्टरांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment