मुंबई - विलेपार्ले प्रभाग क्रमांक ७० येथील लल्लूभाई पार्क परिसरातल्या आधार केंद्रात मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उदघाटन नागालँडचे माजी राज्यपाल पद्यनाभ आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पराग अळवणी, आमदार अमित साटम, स्थानिक नगरसेविका सुनीता मेहता आदी उपस्थित होते.
सध्या पालिकेच्या कूपर रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू आहे, मात्र मोठी लोकसंख्या असलेल्या या प्रभागामुळे त्या केंद्रावर मोठा ताण येत होता. परिणामी जेष्ठ आणि गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांना रांगेत अधिक वेळ उभे राहावे लागत होते. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे तातडीने लसीकरण होणे गरजेचे असल्याने विलेपार्ले आधार केंद्रात कोरोना लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. हे लसीकरण केंद्र दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रभागातील नागरिकांनी या लसीकरण केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक नगरसेविका सुनीता मेहता यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment