ताैती वादळासाठी मुंबई सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 May 2021

ताैती वादळासाठी मुंबई सज्ज



मुंबई - ताैती वादळाचा तडाखा मुंबईला बसण्याचा धाेका असल्याने मुंबई महापालिका आणि मस्य विभाग सज्ज आणि सतर्क झाला आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बाेटी परत आल्या आहेत. सी लिंक दाेन दिवसासाठी बंद करण्यात आला आहे. दहिसर, बीकेसी जम्बाे काेविड केविड सेंटरमधील रुग्णांना अन्यत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. केळवा, पालघर येथील समुद्र किनार्यावर वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे काेळीवाड्यांतील नागरिकांना स्थलांतरीत हाेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौती' वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर आज या वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. उद्या रविवारी आणि सोमवारी 'तौती' चक्रीवादळ मुंबईच्या किनार पट्टीवर धडकणार असून किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहणार आहेत. यातच काही ठिकाणी पाऊस आणि ताशी ७० किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे मुंबई, ठाणे व पालघरला 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. आजपासून समुद्र खवळल्याने या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. १५ तारखेला या तौती चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला तर १६ व १७ मेला मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. समुद्र खवळणार असल्याने काेळीवाड्यातील नागरिकांना सुरिक्षत स्थळी स्थलातर हाेण्याच्या सुचना दिल्या आहेत. मस्य विभागाने काेळीवाड्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

आज शनिवारी कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्याला या वादळाचा फटका बसू लागला आहे. येथील समुद्रात माेठ्या लाटा उसळू लागल्या आहेत. किमान तीन दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याने किनारपट्टीवरील मासेमारी रोखण्याच्या सूचना मेरीटाईम बोर्डाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बाेटी परत बाेलावल्या असल्याची माहिती मच्छिमार सहकारी साेसायटीचे माजी अध्यक्ष जयेश भाईर यांनी दिली. आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास पोलीस, नेव्ही, कोस्टल विभागाकडून मदत घेतली जाणार आहे.

पालिका सज्ज -
वादळासाठी मुंबई महानगर पालिका सज्ज झाली असून लाईफगार्ड, रुग्णवालिका, एनडीआरएफचे जवान तैनात केले आहेत. वादळाच्या काळात समुद्र किमार्यावर फिरण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. पालिकेनेही सर्व चौपाट्यांवर ९३ लाइफ गार्ड तसेच आपत्कालीन स्थितीसाठी सातही अग्निशमन केंद्रांवर साधनसामग्रीसह जवान तैनात ठेवले आहेत. नरिमन पॉइंट, नाना चौक, दादर, अंधेरी, कुर्ला, मालाड, बोरिवली अशा आपत्कालीन अग्निशमन केंद्रांवर, बोट, रोफ आदी साधनसामग्रीसह जवान तैनात आहेत.

जम्बाे सेंटरमधील रुग्ण स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरु -
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोविड रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर केले जात आहे. प्रामुख्याने तीन भव्य (जंबो) कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून ५८० रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये आज रात्रीच सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरु करावयाची आहे. यामध्ये दहिसर कोविड केंद्रातील १८३, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील २४३ आणि मुलूंड कोविड केंद्रातील १५४ रुग्णांचा समावेश आहे. यात अतिदक्षता उपचार, प्राणवायू पुरवठा या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर करताना प्राणवायू पुरवणारे सिलेंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यकता भासल्यास इंजेक्शन व इतर संयंत्रांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यावेळी दिले.

सी लिंक दाेन दिवस बंद -
मुंबईत धडकणार्या वादळामुळे सी लिंक येत्या रविवार आणि साेमवारी असे दाेन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या पूलावर आजपासून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची माेठी गैरसाेय झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad