मुंबई - लशींच्या तुटवड्यामुळे मुंबईत सुरु असलेले लसीकरण १५ व १६ मे रोजी हे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
मुंबईत लशींचा तुटवडा असल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्यात आले आहे. मुंबईतील २४७ केंद्रावर लसीकरण सुरु आहे. यात महापालिकेचे १५३, सरकारचे २० आणि खासगी ७४ केंद्रांचा समावेश आहे. आतापर्यंत २८ लाख १७ हजार ४२५ लशींचे डोस देण्य़ात आले आहे. यामध्ये २६ लाख ३० हजार १७८ कोविशिल्डचे व १ लाख ८७ हजार २४७ कोवॅक्सीनचे डोस देण्यात आले आहेत. सध्या ४५ वयोगटावरील लसीकरण सुरु आहे. मात्र लशी उपलब्ध न झाल्याने शनिवार व रविवारी सर्व केंद्रावरील लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील माहिती मिळेपर्यंत केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
No comments:
Post a Comment